नांदेड : भारतात प्रतिष्ठेचा समजला जाणारा इंटरनॅशनल ग्लोरी, अवार्ड दिशा सर्विसेस चे संचालक विनोद शंकर जाधव, यांनी पटकावला असून, औद्योगिक सेवा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल मुंबई हुजू, येथील हॉटेलला नवोटेल मध्ये प्रसिद्ध तारका, शिल्पा शेट्टी, यांच्या हस्ते बेस्ट इंडस्ट्रियल सेक्रेटरी अँड मॅन पॉवर ,पुरस्कार प्रदान करण्यात आला संपूर्ण मराठवाड्यातून औरंगाबादला हा बहुमान मिळालेले विनोद जाधव, हे एकमेव आहेत..
औद्योगिक क्षेत्रामध्ये 2006 या वर्षापासून विनोद शंकर जाधव हे कार्यरत आहेत. सर्वसामान्य माणसाला पात्रतेनुसार त्यांनी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दिशा सर्विसेस सेक्रेटरी अँड मॅन पॉवर या संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी औरंगाबाद येथील विविध औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा तसेच मनुष्यबळ सेवा देण्याचे गुणवत्तापूर्वक कार्य केले असल्याने त्यांना यावर्षी इंटरनॅशनल ग्लोरी अवार्ड प्रधान करण्यात आला .त्यामुळे विनोद जाधव यांच्या गावाकडील तालुक्यातील लोकांमध्ये या पुरस्कारामुळे वाह… वाह.. होत असुन, त्यासोबत अभिनंदननीय बाब निघत असून ,त्यांचा या सर्कलमध्ये आगमन लवकरचं होणार असुन, त्यांचा भव्य सत्कार करणार असल्याची माहिती पांगरी येथील बालाजी काळे, यांनी दिली.