उस्मानाबाद : २१ जून रोजी जागतिक योगदिनाचे औचित्य साधून डाक विभागा तर्फे विशेष रद्दीकरण शिक्यांचे अनावरण करण्यात आले. लातूर व उस्मानाबाद हेडपोस्ट ऑफिस येथे बुक झालेले सर्व टपाल या विशेष शिक्क्याने छापण्यात आले.तसेच सर्व डाक विभागाचे अधिकारी अन् कर्मचारी ऑनलाइन पद्धतीने योग करण्याची प्रतिज्ञा घेतली. “योगा करा, घरी रहा”असे प्रोत्साहन देण्यात आले. तसेच योगा करा , घरी रहा “ हा शिक्का बनवून त्या शिक्क्यची मोहोर सर्व प्रकारच्या टपालावर उमटविण्यात आली.वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार, ऑनलाइन गूगल मीटिंग द्वारे योग वर्गाचे ऑनलाइन सेशन आयोजित करीत सर्व डाक कर्मचारी यांनी घरी राहून सदर ऑनलाइन योग वर्गास उत्स्फ्रूर्त प्रतिसाद दिला .

योग प्रशिक्षक एस बी जगदाळे, श्री बी एस पाचभाई यांनी योग करण्याचे फायदे व् महत्त्व समजावले तर सदर योग वर्ग डाक अधीक्षक माधवराव पी एस, डाक अधीक्षक, उस्मानाबाद विभाग, मुख्यालय लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणी श्री एस जी गायकवाड,एस पी कोलपाक,एस जे माने,उमरगा डाक निरीक्षक राकेश जेठे,पोस्ट मास्तर डी एम शेख, ओमप्रकाश पाटील,जि.डी.एस (एम सी)सचिन बिद्री, डी बि घोडके, विकास कुंभारे, महादेव पवार, निवृत्ती तेलंग, डी व्ही कंबळे, बि एस सोनवणे आदींसह उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील सर्व डाक कर्मचारी योग दिवस उत्साहात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *