लोहारा पोलिस स्टेशन मधून वृक्षारोपनाने केली सुरुवात
यवतमाळ : आंतराष्ट्रीय मानवाधिकार फेडरेशन चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इरफान मलनस यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त 501 वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. या सामाजिक उपक्रमाची सुरुवात त्यांनी लोहारा पोलिस स्टेशन मधून वृक्षारोपनाने केली.
गेल्या अनेक वर्षापासून इरफान मलनस हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. ते आंतराष्ट्रीय मानवाधिकार फेडरेशन चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर कार्यरत आहे. सध्या पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून झाडांची कत्तल हेच प्रमुख कारण मानले जात आहे. त्यामुळेच वृक्षारोपण करणे गरजेचे असून इरफान मलनस यांनी सुध्दा स्वतापासून कार्याची सुरुवात करण्यासाठी आपल्या वाढदिवसाला वृक्षारोपणाचा संकल्प केला. लोहारा पोलिस स्टेशन च्या ठानेदार पोलिस निरीक्षक दीपमाला भेंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी वृक्षारोपनाला सुरुवात केली. याप्रसंगी पोलिस स्टेशन चा स्टाफ तसेच जिल्हा मानवाधिकार चे पदाधिकारी अॅड. पुजा शेळके, प्रोफेसर पवन निमंकार, सुनील देशमुख, सौ सपना भरूत, सौ उके मॅडम, अॅड. मिलींद गुल्हाने, सुमित गोयल, मयूर राऊत, विनय काचेवानी, सचिन मुनेश्वर तसेच सर्व यवतमाळ जिल्हयातील पदाधिकारी उपस्थित होते. कोरोनाचे संकट अजुनही संपले नसल्याने सरकारने मास्क वापरण्याच्या सुचना दिल्या आहे. त्याअनुषंगाने इरफान मलनस यांनी लोहारा पोलिस स्टेशनच्या सर्व स्टाफ ला मोफत मास्क वितरीत केले. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षाच्या कोरोना संकटात मलनस यांनी सातत्याने गरीब नागरीकांना मास्क, सॅनिटायझर तसेच भोजन वाटप केले. सामाजिक कार्यातील योगदान बघून अनेकांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन इरफान मलनस यांना केक कापून तसेच पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. इरफान मलनस हे यवतमाळ येथे राहत असून गेल्या 12 वर्षापासून मानव अधिकार क्षेत्रात निःस्वार्थ मनाने कार्य करत आहे. संपुर्ण पावसाळयात वृक्षारोपण करण्यासोबतच इतरांनाही वृक्षारोपण करण्यासाठी प्रोत्साहीत करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.