बालमटाकळी ग्रामपंचायतीचे डेपोला निवेदन , अन्यथा लवकरच जनअंदोलन ,



अहमदनगर : बालमटाकळी ही मुक्कामाला येणारी एसटी बस परंतु कोरोनाच्या काळामध्ये ती बंद झाली परंतु आता बंद असलेली मुक्कामी बस पूर्वत सुरू करावी यासाठी बालमटाकळी ग्रामपंचायतने शेवगाव आगाराला निवेदन दिले असून मात्र शेवगाव आगार व्यवस्थापन सुरू करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत असून यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, एसटी बस सुरू न केल्यास जन आंदोलन करण्यात येणार असल्याचे उपसरपंच तुषार वैद्य यांनी सांगितले आहे ,

गेल्या अनेक वर्षापासून अहमदनगर बालमटाकळी ही मुक्कामाला येणारी एसटी बस सुरू होती परंतु कोरोनाच्या काळात ही बंद झाली आणि त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे देखील ती बंद होती परंतु बंद झालेली बालमटाकळीला येणारे मुक्कामी बस गाडी पूर्ववत सुरू करावी यासाठी बालमटाकळी ग्रामपंचायतने शेवगावचे डेपो मॅनेजर यांना बालमटाकळी मुक्कामी एसटी बस सुरू करण्याबाबत लेखी निवेदन दिले असून निवेदनाला मात्र त्यांनी केराची टोपली दाखवली असल्याचे दिसून येत आहे, मुक्कामी बस गाडी सुरू करण्यासाठी ते टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे , बालमटाकळीचे उपसरपंच तुषार वैद्य यांनी देखील त्यांना मुक्कामी बस गाडी सुरू करण्याबाबत फोनवर संपर्क करूनही ते टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे, आमच्याकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने मुक्कामी एसटी बस सुरू करणे अशक्य असल्याचे कारण पुढे करुन डेपो मॅनेजर वासुदेव देवराज हे मुक्कामाला येणारी एसटी बस सुरू करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे , या मुक्कामी एसटी बस मुळे विद्यार्थ्यांचे सकाळी शाळेला जाणारे बालमटाकळी बोधेगाव, चापडगाव ,राक्षी येथील विद्यार्थ्यांचे गैरसोयीचे होत असल्याने ही एसटी बस सुरू करणे अति महत्त्वाचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत असून अनेक वर्षापासून सुरू असलेली अहमदनगर बालमटाकळी मुक्कामी एसटी सुरू न केल्यास लवकरच जनआंदोलन करण्याचा इशारा ही लवकरच शेवगाव आगाराला देण्यात येणार असल्याचेही उपसरपंच तुषार वैद्य यांनी सांगितले ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *