सध्या महाराष्ट्रात एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी फडवणीस यांचे सरकार नुकतेच स्थापन झाले असून या सरकारचा लवकरच पुढील काही दिवसात मंत्रीमंडळ विस्तार होणार असून यामध्ये शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघ अद्यापही अनेक दिवसापासून मंत्रीपदापासून वंचीत आहे. तरीही शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील कर्तव्यदक्ष महिला लोकप्रतिनिधी असलेल्या आमदार मोनिकाताई राजीवजी राजळे यांना महत्वाचे मंत्रीपद देऊन मंत्रिमंडळ विस्तारात संधी द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अंबादास ढाकणे यांनी केली आहे. पुढे अधिक बोलताना श्री ढाकणे म्हणाले की, लवकरच शिंदे व फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार असून यामध्ये आमदार मोनिकाताई राजळे यांना महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण कॅबिनेट मंत्रीपदी संधी द्यावी. त्या अनुषंगाने शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील विकासात्मक कामे आणखी मोठ्या प्रमाणात होऊन शेवगाव-पाथर्डी तालुक्याचा विकास साधता येईल. आणि याचा फायदा देखील महाराष्ट्र राज्याला निश्चितच होईल. अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अंबादास ढाकणे, ज्येष्ठ नेते तालूका सरचिटणीस रामकाका केसभट, ओबीसीचे भटक्या जमातीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डमाळे, शक्ती केंद्रप्रमुख संदीपराव देशमुख, बबनराव घोरतळे, केशव आंधळे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी आशा व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *