अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पिंगेवाडी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी संघर्ष योध्दा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे हेड किपर अधिकारी विठ्ठलराव मुंडे यांची निवड झाल्याने त्यांचे सहकारी मित्र तसेस केदारेश्वर कारखान्याच्या बालमटाकळी येथील कर्मचाऱ्यांनी त्यांचा कारखाना कार्यस्थळावर शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला. तसेच त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी केदारेश्वर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी राजेंद्र केसभट, कारखान्याचे सर्वश्री कर्मचारी अशोकराव काळे, मल्हारी घुले, उत्तमराव वैद्य, श्री ढाकणे साहेब, श्री बडे साहेब, भास्कर मासाळकर यांच्यासह आदी कारखान्याचे कर्मचारी तसेच कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.