उस्मानाबाद : (सचिन बिद्री) उमरगा तालुक्यातील नळवाडी येथील लक्ष्मण नेताजी कवठे यांनी एम .पी.एस.सी. परीक्षेत यश मिळवत जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता वर्ग २ चे पद प्राप्त केले त्याबद्दल त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दि .२४ रोजी जिल्हाध्यक्ष प्रा . सुरेश बिराजदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
उमरगा तलुक्यातील नळवाडी येथील शेतकरी नेताजी कवठे यांचे चिरंजीव लक्ष्मण नेताजी कवठे यांनी एम .पी.एस.सी. परीक्षेत यश मिळवत जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता वर्ग २ चे पद प्राप्त केले त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्काराचे आयोजन उमरगा येथे करण्यात आले होते . अत्यंत अडचनीच्या प्रतिकुल परिस्थीतीत जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पुर्ण करूण महाविद्यालयीन शिक्षण श्री . छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथे घेतले त्यानंतर त्यांनी पंढरपुर व कोल्हापुर येथे अभियंता पदाचे शिक्षण घेतले .वडील नेताजी कवठे यांनी पाच एकर शेतीवर मोठ्या कष्टाने तीनही मुलांना अभियंता बनवले त्यामुळे त्यांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला .
यावेळी सृष्टी कवठे , स्मीता कवठे , संभाजी कवठे सुरज कवठे सचिन कवठे बाळासाहेब कवठे विक्रम कवठे महेश कवठे यांच्यासह गोवींदराव साळुंके , प्रताप तपसाळे, महादेव पाटील, अॅड . दयानंद माळी , जगदीश सुरवसे र शमशोद्दीन जमादार ,बालाजी साळुंके , बाळु माशाळ, कुमार थीटे, देवीदास पावशेरे , बाबा पवार , व्यंकट बिराजदार , अभिजीत माडीवाले , धीरज बेळंबकर , ओम गायकवाड , ज्ञानदीप सुर्यवंशी , अफसर शेख , विजय पाटील , खंडु काळे , यांच्यासह कार्यकर्ते मोठया संखेने उपस्थित होते .
