प्रतिनिधी (आयुब शेख )

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची खबर मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशावरुन अपर पोलीस अधीक्षक यांचे वाचक- सपोनि श्री अमोल पवार, पोलीस नियंत्रण कक्षाचे पोउपनि- श्री. संदीप ओहोळ यांसह पोलीस पथकाने आज दि. 24 जुलै रोजी रात्री 03.00 वा. सु. नळदुर्ग येथे रवाना होउन नळदुर्ग पो.ठा. चे सपोनि- श्री. सिध्देश्वर गोरे यांच्या मदतीने शहरातील तीन अवैध कत्तल खान्यावर छापे टाकले.

यावेळी गोपनीय खबरेच्या आधारे 06.10 वा. सु. कुरेशी गल्ली येथे तीन छापे टाकले. पहिल्या छाप्यात निजाम अजीज कुरेशी व महेमुद रहेमान कुरेशी हे दोघे अजीज कुरेशी यांच्या घरी गोवंशीय जनावरांचे अंदाजे 24,000 ₹ किंमतीचे 200 कि.ग्रॅ. मांस व तीन धारदार सत्तुर व चाकु बाळगलेले मिळुन आले. दुसऱ्या छाप्यात अरबाज शब्बीर कुरेशी हे आपल्या घरालगतच्या बोळीत गोवंशीय जनावरांचे अंदाजे 48,000 ₹ किंमतीचे 400 कि.ग्रॅ. मांस व एक सत्तुर व चार चाकु मिळुन आले. बातमीप्रमाणेच तीसऱ्या छाप्यात सादीक सत्तार कुरेशी यांच्या घरी सादीक यांसह मुन्ना नसीर कुरेशी, मुदस्सर गफार कुरेशी हे गोवंशीय जनावराचे अंदाजे 30,000 ₹ किंमतीचे 250 कि.ग्रॅ. मांस व तीन सत्तुर व पाच चाकु तसेच त्यांच्या ताब्यात कत्तलीसाठी बांधलेले दोन खोंड व एक कालवड असे तीन गोवंशीय जनावरे मिळुन आले. यावर पथकाने अंदाजे 1,32,000 ₹ किंमतीचे गोवंशीय मांस व जीवंत तीन जनावरे जप्त करुन प्रयोगशाळा परिक्षणाकरीता पशुधन विकास अधिकारी, अणदुर डॉ. श्री. खाडे यांच्यामार्फत मांसाचे नमूने काढले आहेत. तसेच जप्त मांस हा नाशवंत पदार्थ असल्याने तो नगरपरिषद नळदुर्ग यांच्या डंम्पींगच्या जागेत खड्ड्यात पुरुन नाश केले व तीन गोवंशीय जणावरे ही गो शाळेत देण्याची कार्यवाही केली आहे. या प्रकरणी पोउपनि- श्री. संदीप ओहोळ यांनीसरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 5, 9 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- श्री. अमोल पवार, पोउपनि- श्री. संदीप ओहोळ, पोहेकॉ- माने, पोना- भोजगुडे, लोखंडे, पोकॉ- जमादार, नाईकवाडी व दंगा काबू पथक यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *