उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील श्री क्षेत्र रामलिंग मंदीर यात्रे निमित्त डी वाय एस पी कल्याण देटे यांच्याकडून पाहणी व विविध उपयोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या

उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील श्री क्षेत्र रामलिंग मंदिर हे मराठवाड्याचे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते या ठिकाणी श्रावण महिन्यानिमित्त एक महिनाभर यात्रा भरते या यात्रेकरिता महाराष्ट्र तसंच कर्नाटक राज्यातून देखील भाविकांची मोठी गर्दी असते या पार्श्वभूमीवर डी वाय एस पी श्री कल्याण देटे साहेब यांनी पाहणी करुन योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या

यावेळी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश साबळे साहेब. ग्रामविकास अधिकारी संजय आडे साहेब .सरपंच गोपाळ नागटिळक ग्रा.प सदस्य चंदन नलावडे.साखरे साहेब भातलंवडे साहेब.चौधरी साहेब संतोष बप्पा पवार ग्रा.प सदस्य कुमेश पवार राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष अमोल कवडे बाळु जाधव गणेश नलावडे पवन होवाळ. समाधान होवाळ .यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद