पुणे : इंदापूर तालुक्यातील काटी येथे एका चिमुकलीला हायवा ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हे समजताच राजवर्धन पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. आज सकाळी वडील आणि आपल्या लहान भाऊ सोबत शाळेला निघालेल्या बारा वर्षे ची तृप्ती ला खडी वाहून नेत असलेल्या हायवा ट्रकखाली दुर्दैवी निधन झाल्याची घटना आज सकाळी दहा वाजता इंदापूर तालुक्यातील काटी येथे घडली काटी वडापुरी रस्त्यावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेत तृप्ती नानासाहेब कदम राहणार काटी इंदापूर तालुक्यातील या सातवी मध्ये शिकणाऱ्या मुलीचा जागेस मृत्यू झाला. हे समजतात राजवर्धन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच राजवर्धन पाटील यांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट दिली यावेळी पोलीस निरीक्षक मुजावर साहेब यांच्याशी त्यांनी चर्चा केली. रस्त्याच्या अपघातामुळे शाळकरी मुलीचा झालेला मृत्यू ही घटना अतिशय दुर्दैवी असून या दुर्दैवी घटनेमुळे कदम कुटुंबावर मोठे संकट निर्माण झाले असून त्यातून सावरण्याची परमेश्वराने शक्ती देवो अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली आहे.

एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *