पुणे : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत खरीप २०२२ हंगामासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै २०२२ असा होता. दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी रविवार हा शासकीय सुट्टीचा वार असल्यामुळे केंद्र शासनाने मार्गदर्शक सुचनेत व पत्रात नमुद केल्यानुसार आता विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक १ ऑगस्ट २०२२ असा असणार आहे असे कृषी सहाय्यक अशोकराव जाधव यांनी सांगितले.
बाजरी पिक विमा संरक्षित रक्कम २४ हजार रूपये, जोखीम स्तर ७० टक्के, विमा हप्ता दर २ टक्के, भरावयाची रक्कम ४८० रूपये,
मुग पिक विमा संरक्षित रक्कम २० हजार रूपये,जोखीम स्तर ७० टक्के, विमा हप्ता दर २ टक्के, भरावयाची रक्कम ४०० रूपये,
भुईमूग पिक विमा संरक्षित रक्कम ४० हजार रूपये, जोखीम स्तर ७० टक्के, विमा हप्ता दर २ टक्के, भरावयाची रक्कम ८०० रूपये,
तूर पिक विमा संरक्षित रक्कम ३५ हजार रूपये, जोखीम स्तर ७० टक्के, विमा हप्ता दर २ टक्के, भरावयाची रक्कम ७०० रूपये,
उडीद पिक विमा संरक्षित रक्कम २० हजार रूपये ,जोखीम स्तर ७० टक्के विमा हप्ता दर २ टक्के , भरावयाची रक्कम ४०० रूपये असल्याचे कृषी सहायक जाधव यांनी सांगितले.
पिक विमा भरण्यासाठी विहीत नमुन्यातील फॉर्म भरून देणे, ७/१२ व ८ अ उतारा, बँक पासबुक, आधारकार्ड, स्वघोषित पिक पेरा प्रमाणपत्र ही कागदपत्र अत्यावश्यक असल्याचे कृषी सहाय्यक जाधव यांनी सांगितले.प्रधानमंत्री पिक विमा योजनेसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास व विमा भरण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयकृत बँक, तसेच अधिकृत आपले सरकार सेवा केंद्र सी एस सी सेंटर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी सहाय्यक अशोकराव जाधव यांनी केले आहे. मुग, उडीद, सोयाबीन पिकावरील पिवळा मोझँक रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व पांढ-या माशीच्या नियंत्रणासाठी थायोमिथँस्कॉम २५ डब्लू .जी.५ ग्रॅम प्रती १५ लिटर पाण्यात किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के ची १० मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी असे आवाहनही शिक्रापूर येथील कृषी सहाय्यक अशोकराव जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *