पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या यिनकॉनक्लेव 2022 मध्ये यिन केंद्रीय कॅबिनेट शिक्षण समिती मध्ये श्री. ज्ञानेश्वर यशवंत कल्हापुरे यांना संघटक म्हणून जबाबदारी देण्यात आली महाराष्ट्रभरातून यिन आजी माजी पदाधिकारी यांच्या मधून एकूण दहा समित्या स्थापन करण्यात आल्या आहे. या समितीच्या निवड प्रक्रिये करीता परीक्षा, मुलाखत, मागील सामाजिक व शैक्षणिक कामाचा अहवाल अशे अनेक टप्पे पार करुन विद्यार्थ्यांच्या कामाचा अनुभव पाहून निकाल लावण्यात आला.
श्री. कल्हापुरे यांचा मानस आहे की, आजच्या काळात विद्यार्थ्याचा शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी ते त्यांच्या समिती मार्फत महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये योग्य सांगड घालून सर्व योजना ग्रामीण भागात पोहचवणे, विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेणे, शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणणे आदी. महत्त्वाची कामे हाती घेणार आहे
या कार्यक्रमासाठी मा. अभिजित पवार साहेब, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, अभिनेता सर्वभ गोखले , निवडणूक अधिकारी प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे बबन जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते.
