पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार 'हर घर तिरंगा' घरोघरी तिरंगा हे ऐतिहासिक अभियान राबवण्यात येत आहे. या देशप्रेमी अभियानामध्ये प्रत्येक नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे, सर्व नागरिकांना केले आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याचा पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा इतिहासापासून चालू पिढीला प्रेरणा मिळाली स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या योजनांच्या मनामध्ये राहावी, असे वक्तव्य माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे.
'हर घर तिरंगा' अभियान है पंथ, पक्ष, धर्मवीरहित असून देशाप्रति राष्ट्रभावना जागृत करणे, यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला अशी पिढी आता काळाच्या अडचणी आहे. त्यामुळे नव्या पिढीला स्वातंत्र्याच्या इतिहासाचे स्मरण करून देणे हा सिद्धांत येतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'हर घर तिरंगा' या संकल्पनेमध्ये आहे, असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले आहे.

यावेळी बावडा या गावांमध्ये मा.हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संस्था व संघटनांच्या वतीने युवकांना ध्वजाचे वितरण करण्यात आले आहे.
या कार्यक्रम प्रसंगी बावडा या गावातील सरपंच किरण पाटील, मनोज पाटील, विठ्ठल घोगरे, अमोल घोगरे, पवनराजे घोगरे, प्राचार्य डी आर घोंगरे ,प्राचार्य भीमराव घोरपडे, प्राचार्य भीमराव आवारे ,प्राचार्य सी.टी कोकाटे, मुख्याध्यापक ए. बी सुळे तसेच अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्रतिनिधी : पल्लवी चांदगुडे
इंदापूर पुणे