उस्मानाबाद : उस्मानाबादच्या तत्कालीन उपविभागीय अधिकारी (SDO)तथा भुसंपादन अधिकारी शोभा राऊत यांची लाच घेतल्याप्रकरणी निर्दोष सुटका.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,सण २०१७ साली शोभा राउत या उस्मानाबाद येथे उपविभागीय अधिकारी म्हणुन कार्यरत होत्या.कौडगाव येथील दत्तात्रय देशमाने व इतर शेतकऱ्यांच्या जमीनी शासनाने संपादित केल्या होत्या.परंतु काही शेतकर्यांना मावेजा मिळाला नाही.सदर मावेजाचे धनादेश देण्यासाठी शोभा राउत यांनी फीर्यादीकडे मावेजाच्या ५% दराने लाचेची मागणी केली व त्याप्रमाणे लाच दिली तरच धनादेश दिले जातील असे सांगितले.फिर्यादीने आरोपीच्या सांगण्याप्रमाणे ६-७ शेतकरी एकत्र केले. फिर्यादीची लाच देण्याची इच्छा नसल्याने फीर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद येथे आरोपी ही रुपये ३९२०० /- लाच मागणी करत असलेबाबत तक्रार केली. सदर तक्रारीच्या अनुशंगाने सापळा रचुन आरोपीच्या कार्यालयात लाच घेताना पोलिसांनी अटक केली व आरोपी विरुद्ध लाच प्रतिबंधक कायद्याचे कलम ७,१३(१)(ड) सह १३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.वरीष्ठ महसुल अधिकारी सापळ्यात अडकल्यामुळे जिल्ह्यांमध्ये खळबळ उडाली होती.सदर प्रकरणाची सुनावनी विशेष न्यायालयात झाली होती.प्रकरणात एकुन ५ साक्षीदार तपासण्यात आले होते. विशेष न्यायालयात आरोपी भुसंपादन अधिकारी यांचा बचाव जेष्ठ वकील अॅड.अमोल गुंड यांनी केला होता. आरोपीला खोट्या गुन्ह्यांत गोवले असुन आरोपीला शिक्षा देण्या इतपत पुरावा सरकार पक्षाकडे नाही तसेच लाच मागणी केलेबाबत ठोस पुरावा नसून साक्षीदारांचे जबाब विश्वासहार्य नसल्याबाबत अॅड. अमोल गुंड यांनी युक्तीवाद केला होता. परंतु विशेष न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरला नाही व आरोपीला दि. २७/०२/२०१७ रोजी खटला क्रं.११/१५ मध्ये शिक्षा दिली होती. सदर निकालाविरुद्ध आरोपी विरुद्ध मा.उच्च न्यायालयात क्रि.अपील क्र.१०३/२०१७ दाखल केले त्याची सुनावणी औरंगाबाद खंडपीठात मा.न्यायमुर्ती विभा कंकनवाडी यांच्या न्यायपीठापुढे झाली. विशेष न्यायालयात उपस्थित केलेले बचावाचे सर्व मुद्दे उच्च न्यायालयाने ग्राह्य धरले तसेच आरोपीने लाच मागणी केल्याचे सिद्ध होत नसल्याचे नमुद केले व विशेष न्यायालयातील सुनावनीदरम्यान वकीलांनी फिर्यादी व इतर साक्षीदारांचे घेतलेले उलट तपास पाहता व तांत्रिक पुरावा व त्यामधील त्रुटीं पाहता आरोपीला शिक्षा देतां येणार नाही असे नमुद करुन तत्कालीन भुसंपादन अधिकारी शोभा राऊत यांची निर्दोष मुक्तता केली.
विशेष न्यायालय उस्मानाबाद यांनी विशेष खटला क्र.११/२०१५ मध्ये दिलेला निकाल रद्दबातल करुन आरोपीची निर्दोष मुक्तता केली. विशेष न्यायालयात आरोपी तर्फे अॅड.अमोल हनुमंतराव गुंड यांनी काम पाहीले व त्यांना ॲड. महेश चव्हाण यांनी सहकार्य केले होते.मा. उच्च न्यायालयात विधी सेवा समीती तर्फे ॲड. एन. आर.शेख यांनी काम पाहीले.
सचिन बिद्री