पुणे : यूपीएससी परीक्षेत देशात 92 वा रँक …. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशात 92 व्या रँकने उत्तीर्ण होऊन दैदीप्यमान असे यश मिळविल्याबद्दल रेडणी (ता. इंदापूर) येथील विजय संजय देवकाते यांचा निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.14) घरी भेट देऊन सत्कार केला. ग्रामीण भागातील युवक जिद्द, कष्ट व बुद्धिमत्तेच्या जोरावर केंद्र व राज्य सरकारच्या सेवेत मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.
विजय देवकाते यांचे हे यश युवकांना प्रेरणादायी असे आहे, असे गोरोदगार यावेळी राजवर्धन पाटील यांनी काढले. याप्रसंगी अमरदीप काळकुटे, उपसरपंच प्रकाश शेडगे, मच्छिंद्र तरंगे, हनुमंत तरंगे, रामभाऊ तरंगे, हनुमंत तरंगे गुरुजी, देवकाते कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते.
पल्लवी चांदगुडे