इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे धक्कादायक घडला प्रकार .
पुणे : पत्नी नांदायला येत नाही म्हणून आपल्या पत्नीसह मेहुना व सासरे यांच्या वरती कोयत्याने वार करत तिघांनाही जखमी केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. शुक्रवार 26 ऑगस्ट रात्री साडेनऊ वाजता घडलेल्या या घटने संदर्भात शुभम शिवाजी शेलार तालुका इंदापूर यांनी जनार्दन गोविंद गाडे राहणार न्हावरा तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.आरोपी यांनी आपल्या पत्नीच्या माहेरी घरात घुसून पत्नी कोमल गाडे यांना शिवीगाळ करत तु नांदायला का येत नाही ? तुला आता जिवंत ठेवणार नाही’ असे म्हणत कोयत्याने कोमल त्यांच्या डोक्यात व हातावर वार केले.
बहिणीला सोडवण्यासाठी गेलेल्या कोमल यांचा भाऊ शुभम शेलार व वडील शिवाजी शेलार यांच्यावरही आरोप कोयत्याने वार करून त्यांना जबर जखमी केले आहे. फिर्यादीच्या आई व आरोपीच्या सासू अंजना शिवाजी शेलार यांनाही आरोपीने लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.या घटनेत फिर्यादी शुभम शेलार वडील शिवाजी शेलार बहीण व आरोपीच्या पत्नी कोमल गाडे हे सर्व जण गंभीर जखमी झाले आहेत कोमल गाडे यांना उपचारासाठी पुण्यातील ससुर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पुन्हा मारण्याची धमकी देऊन फराळ झालेल्या आरोपी जनार्दन गाडे याला इंदापूर पोलिसांनी अटक केली, असून शनिवारी 27 ऑगस्ट त्याला इंदापूर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला सोमवारी 29 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने करत आहेत.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे