पुणे : इंदापूर विकास गटातील अस्मिता महिला प्रभाग संघ संस्था सणसर यांचे वतीने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व उमेद अभियानाच्या प्रकल्प संचालिका शालिनी कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील विविध ठिकाणी भारत सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत काम करणाऱ्या 37 महिला स्वयंसहाय्यता समूहांना 75 व्या आझादी के अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 75 लाख रुपयांचे बँक कर्ज वाटप करण्यात आले. यामध्ये महिला विविध प्रकारच्या उपजीविका सुरू करणार आहेत.
हिंगणेवाडीच्या आशिर्वाद महिला ग्रामसंघाला 3 लाख रुपये व चिखली च्या उत्कर्ष महिला ग्रामसंघाला 3 लाख रुपये समुदाय गुंतवणूक विकास निधी व दोन्ही ग्रामसंघाला प्रत्येकी 75 हजार रुपयांचा जोखिम प्रवण निधी वितरित करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी तालुका व्यवस्थापिका राणी ननवरे,प्रभाग समन्वयक डी. जे. राऊत,शाखाधिकारी झेंडे साहेब,समूह संसाधन व्यक्ती कविता केकाण ,राणी सांगळे,मंदाकिनी घोडके,अर्चना कणसे,सुरेखा चव्हाण,बँक सखी फातिमा शेख व महिला उपस्थित होत्या.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे