पुणे : इंदापूर तालुक्यांमध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत कार्यशाळा आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक म्हणून इंदापूर तालुक्यातील कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांनी केले.
अनेक शेतकरी तसेच बेरोजगार यांनी कृषी मालावर प्रक्रिया करून त्यांचे मूल्यवर्तन करून जास्तीत जास्त तरुणांनी यामध्ये सहभागी व्हावे असे त्यांनी शेतकऱ्यांना व बेरोजगारांना तसेच नवीन पिढीला मार्गदर्शन केले आहे.
अनेक प्रकारचे फळे, भाजीपाला व अन्नधान्य पासून कोणकोणते प्रक्रिया पदार्थ तयार होतात याविषयी मार्गदर्शन केले आहे
कृषी विज्ञान केंद्र बारामती चे राज्य समन्वय समाधान पानसरे यांनी योजनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
तसेच बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापक यांनी ज्यांना बँकेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास मला संपर्क करावा असे वक्तव्य केलेले आहे, आणि महिलांना मार्गदर्शन केले आहे. बचत गटातील महिलांना कोणत्या प्रकारच्या योजना आहेत,कोणत्या प्रकारचा लाभार्थ मिळतो या सर्व प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे.याप्रसंगी लाभार्थी यांना योजनेचे अर्ज वाटप करण्यात आले व भरलेले अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.
या कार्यक्रमासाठी महिला बचत गट शेतकरी व क्षेत्रीय स्तरावरील मंडळ कृषी अधिकारी बाळासाहेब कोकणे, गणेश सूर्यवंशी, विजय बोडके सतीश महारनवर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे