तपासी अंमलदार पोलीस नाईक विकास पाटील यांची माहिती
पुणे : शिक्रापूर चाकण रस्त्यावरील करंदी गावच्या हद्दीत गॅस फाटा येथे रात्रीच्या अंधारात चोरीसारखा गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या दोघा संशयितांना शिक्रापूर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
अमीन लाला खान वय -२५ वर्षे हल्ली रा.कारेगाव ता.शिरूर जि.पुणे ,मुळ रा.भागड ता.जयपूर जि.सैडोहाल , मध्यप्रदेश व विजय संजय निकम वय – २१ वर्षे हल्ली रा. शरद पाचर्णे यांच्या रूममध्ये कारेगाव ता.शिरूर जि.पुणे मुळ रा.चोरवड ता.भुसावळ जि. जळगाव अशी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयित आरोपींची नावे आहेत.तपासी अंमलदार, पोलीस नाईक विकास पाटील यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार आरोपी अमीन लाला खान व आरोपी विजय संजय निकम हे करंदी गावच्या हद्दीत गॅस फाटा येथे रात्रीच्या अंधारात चोरीसारखा गुन्हा करण्याच्या तयारीत असताना संशयितरित्या मिळून आले.पोलीसांनी दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी करून त्यांच्याकडून मालाविरूद्धचा गुन्हा घडू नये म्हणून त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ ( क ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विकास पाटील सदर गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
