पुणे : शिक्षक हे जीवनाला दिशा देतात. जीवनात शिक्षकांचे स्थान अनन्यसाधारण असल्याचे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ पाटील यांनी व्यक्त केले. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या ५ शिक्षकांना शिरूर येथील हलवाई गणेश मित्रमंडळाच्या वतीने शिक्षकदिनानिमित्त प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील बोलत होते.चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील भूगोल विभागाचे प्रा. डॉ. ज्योती भगवान धोत्रे, आमदाबाद येथील पांडूरंग थोरात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वाती प्रकाश थोरात, देवदैठण येथील विद्याधाम प्रशालेतील क्रिडाशिक्षक संदीप भाऊसाहेब घावटे, पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्कूलच्या शिक्षिका विद्या प्रल्हाद वाघमारे /सोळसे या शिक्षकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ पाटील पुढे बोलताना म्हणाले, प्रत्येकाने आपल्या आईवडिलांसह शिक्षकांचा आदर व सन्मान करणे गरजेचे असून यशासाठी नियमित अभ्यास ,सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे.प्रास्ताविकात बोलताना प्राध्यापक सतिश धुमाळ म्हणाले, समाजनिर्मितीचे खूप मोठे समाधान शिक्षक म्हणून काम करताना शिक्षकांना मिळत असतं म्हणूनच शिक्षकांचा सन्मान आपण यंदाच्या वर्षी करतोय.माजी मुख्याध्यापक व्ही डी कुलकर्णी या़चे तसेच पुरस्कार प्राप्त शिक्षकांची भाषणे यावेळी झाली. प्राचार्य डॉ. समीर ओंकार यांनी उपस्थित़ाचे स्वागत केले. रणजित गायकवाड यांनी आभार मानले.