पुणे : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे – कासारी रोडलगत वेळनदीच्या कडेला देशी दारूची चोरून विक्री करणा-या एकास शिक्रापूर पोलीसांनी ताब्यात घेतले.
किसन शंकर शिंदे वय – ४१ रा.सांगवी सांडस ता.हवेली जि.पुणे असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून पोलीस कॉन्स्टेबल भास्कर महादेव बुधवंत यांनी याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. तपासी अंमलदार, पोलीस हवालदार किशोर तेलंग, अमोल चव्हाण यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार आरोपी किसन शंकर शिंदे हा तळेगाव ढमढेरे ते कासारी रोडलगत वेळनदीच्या कडेला देशी दारूची चोरून विक्री करत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांमार्फत मिळाल्याने पोलीस हवालदार किशोर तेलंग , अमोल चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल भास्कर महादेव बुधवंत दोन पंचांसह सदर ठिकाणी जावून छापा टाकला असता आरोपी किसन शंकर शिंदे सह त्याच्या ताब्यात १८० मिलीलीटरच्या ८४० रूपये किंमतीच्या एकूण १२ देशी दारूच्या बाटल्या असा माल मिळून आला.आरोपी किसन शंकर शिंदे याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ ( ई ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे असे तपासी अंमलदार, पोलीस हवालदार किशोर तेलंग, अमोल चव्हाण यांनी सांगितले.
