स्व.कोकीळाबाई ठाकरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्य ऊपक्रम
वाशिम:- श्री.मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोळा अंतर्गत येत असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रि प्रायमरी तसेच प्रायमरी इंग्लीश स्कुलमध्ये स्व.कोकीळाबाई ठाकरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्य विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर दि.२० सप्टेबर रोजी घेण्यात आले.
यशवंतराव चव्हाण प्रि.प्रायमरी तसेच प्रायमरी इंग्लीश स्कुलमध्ये नेहमी प्रेरणादायी तसेच विद्यार्थी हिताचे विविध ऊपक्रम नेहमी राबवल्या जातात.दि.२० सप्टेबर रोजी शाळेमध्ये स्व.कोकीळाबाई ठाकरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

या शिबिरामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन आवश्यक तो औषधी पुरवठाही मोफत करण्यात आला.लहान मुलांच्या आरोग्याची वेळीच काळजी घेणे खुप गरजेचे असते त्यामुळे ही आरोग्य तपासणी आणी ऊपचाराचे शिबिर राबवल्याचे संस्थेकडुन सांगण्यात आले.या शिबिराचे ऊद्घाटन माजी राज्यमंञी सुभाष ठाकरे यांनी केले.संस्थेचे सचिव जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे ,राम ठाकरे,शितल ठाकरे आदी मान्यवरांनी या शिबिराविषयी समाधान व्यक्त करत भविष्यातही असेच समाजपयोगी व विद्यार्थ्यांना ऊपयोगी असणारे विविध ऊपक्रम राबवण्याचा मानस बोलुन दाखवला.

या आरोग्य तपासणी शिबिरासाठी डाॅ.ठाकरे,डाॅ.श्रिकांत जाधव,आरोग्य सेविका सविता ऊबाळे,आरोग्य सेवक पंडित,मोहनावाले व आरोग्य विभागाच्या चमुने मोलाची भुमिका बजावली.यावेळी प्रा.जितेंद्र सुर्वे,प्रा.पडवाल ऊपस्थीत होते.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका पुरोहित,शारा,निलेश पाटील,नितिन ठाकरे,रोशनी,गावंडे आदी शिक्षकांसह शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.शिबिराच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मिठाई व खाऊचे वाटप करुन सांगता करण्यात आली.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206