कृषी मंञी ठोस मदत करणार की आश्वासनाची खैरातच वाटणार,शेतकर्‍यामध्ये प्रतिक्षा


वाशिम : कृषी मंञी अब्दुल सत्तार २३ सप्टेबर रोजी वाशिम जिल्ह्याच्या दौर्‍यावर असतांना दुपारी १२ वाजता मंगरुळपीर येथे हिंदु गर्व गर्जना संपर्क मेळाव्याला ऊपस्थीत राहुन मार्गदर्शन करणार आहेत.मंगरुळपीर तालुक्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे अतिवृष्टी झाली.पिके पाण्याखाली जावुन शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावल्या गेला.नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन शासनाने ठोस आर्थिक मदत करावी यासाठी अनेकांनी निवेदनाव्दारे व स्वतःही शासकीय कचेर्‍याचे ऊंबरठे झिजवले.काही ठिकाणी शासनदप्तरी अतिवृष्टीची नोंदच नाही त्यामुळे शेतकरी मदतीपासुन वंचित राहणार असल्याने तालुक्यातील पोटी मंडळाचे शेतकरी आक्रमक होवून तहसिलला धडकले होते.शिवणी रोड येथील अडाण नदिकाठची पिके सर्रास पाण्याखाली गेली.आमदार,प्रशासकीय अधिकार्‍यांनी पाहणी केली.मदतीचे भाराभर आश्वासने दिलेत.खुद्द जिल्हाधिकार्‍यांनी येवुन परिसरातील शेतकःर्‍यांची नुकसानीची परिस्थीती बघीतली पण त्यावेळीही दिलेले आश्वासन हवेतच विरले.आता खुद्द कृषीमंञीच जिल्हा दौर्‍यावर असतांना शेतकर्‍याची परिस्थिती बघणार अशि आशा शेतकर्‍यांना लागुन होती पण मंगरुळपीर येथे हिंदु गर्वगर्जना शिवसेना संपर्क मेळावा घेणार आणी यामध्ये आश्वासनाची खैरातच वाटणार की शेतकर्‍यांना ठोस मदतीची व्यवस्था शासनस्तरावर लावणार याकडे शेतकर्‍यांच्या आशा लागुन आहेत.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *