अहमदनगर : कै.सूमन कुंडलिकराव दुसुंगे यांचे प्रथम वर्ष श्राद्ध वारुळवाडी वट वृक्षाचे रोपटे लावून एका चांगल्या उपक्रमाने पार पडले. या वेळी ह.भ.प.आत्माराम महाराज सुरवसे यांचे छान असे प्रवचन झाले.या वेळी गावचे पोलिस पाटील भिमराज साठे यांनी श्रद्धांजली वाहतांना दुसुंगे पाटील परिवाराच्या दुखात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले व दुसुंगे पाटील परिवारा कडुन समाजकार्य घडो असे मनोगत व्यक्त केले.भिंगार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय सपकाळ यांनी कै.सूमन कुंडलिकराव दुसुंगे या आमच्या थोरली बहीण होत्या. त्यांचे आम्हाला व आमच्या सर्व नातेवाईकांना व मित्र परिवाराला मार्गदर्शन व सहकार्य असायचे…पै.अक्षय दादा कर्डीले यांनी आपले मनोगत व्यक्त केले “कै सूमन कुंडलिकराव दुसुंगे या एक आदर्श माता होत्या, त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढता येणार नाही पण, दुसुंगे परिवाराच्या वटवृक्ष लावण्याचे उपक्रमाने त्या नेहमी दुसुंगे परिवारालाच नव्हे तर आपना सर्वांना मायेची सावली देत राहतील, दुसुंगे पाटील परिवाराचा त्यांच्या आईं च्या स्मरणार्थ वटवृक्ष लावण्याचा उपक्रम खरोखरच खूप कौतुकास्पद आहे “. कै.सूमन कुंडलिकराव दुसुंगे या काँग्रेस च्या तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या प्रदेश सदस्या सौ शिल्पाताई अशोकराव दुसुंगे यांच्या सासुबाई होत्या…त्यांच्या मागे दोन मुले एक मुलगी दोन सुना एक जावई तिन नातवंड व दोन नाती असा परिवार आहे.