सचिन बिद्री:उमरगा
नूतन इमारतीचे उद्घाटन दि .१ ऑक्टो रोजी ना.अजित दादा पवार यांच्या हस्ते होणार – -प्रा.सुरेश बिराजदार
ठेवीदार,सभासद व कर्जदार यांच्या सहकार्याने बँकेने सव्वीस वर्षात प्रगतीचे शिखर गाठले, ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरत बँकेची यशस्वी वाटचाल सुरू असुन शंभर कोटींचा टप्पा ओलांडला आहे .बँकेच्या नुतन सुसज्ज इमारतीची उभारणी केली आहे .तर बँकेचा एन.पी.ए. शुन्या पर्यंत आणण्यासाठी कर्जदार बंधूंनी सहकार्य करून बँकेच्या प्रगतीला हातभार लावावा असे आवाहण भाऊसाहेब बिराजदार अर्बन को ऑपरेटीव्ह बँकेचे अध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार यांनी केले.
भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँकेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनीवार ( ता. २४ ) भाऊसाहेब बिराजदार बँकेत आयोजित करण्यात आली होती त्यावेळी प्रा. बिराजदार बोलत होते. बँकेचे दिवंगत उपाध्यक्ष कै .नानासाहेब मुसांडे व दिवंगतांना श्नद्धांजली वाहण्यात आली . संचालक सुनील माने, गोविंदराव साळुंके, विजयकुमार सोनवणे, व्यंकटराव सोनवणे,संजय गायकवाड,साहेबराव पाटील ,आदींची यावेळी उपस्थिती होती. प्रा. बिराजदार पुढे म्हणाले की, बँकेने मागील २६ वर्ष पारदर्शक कारभार करून सर्व निकषाचे पालन करत सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. हजारो बेरोजगार तरूणांना रोजगार निर्मितीसाठी बँकेने अर्थसहाय्य केले आहे. ठेवीदाराने बँकेवर विश्वास व्यक्त करून शंभर कोटी रूपयाच्या ठेवी ठेवल्या आहेत. संगणकीकरण, कोअर बँकींग, एस. एम.एस.,आरटीजीएस, एनईएफटीची , सुरक्षीत लॉकर, सुविधा बँकेने सुरू केली आहे. तर येत्या वर्षात युपीआय , एटीएम सुविधा सुरू करण्याचा माणस आहे . बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन दि .१ ऑक्टो रोजी विरोधी पक्षनेते ना.अजित दादा पवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे तरी मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित रहावे
असे आवाहन प्रा.बिराजदार यांनी केले.
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.के. शहापूरे यांनी सभेपुढील विषयांचे वाचन केल्यानंतर सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. या वेळी पद्माकरराव हराळकर , प्रा. सतीश इंगळे, नगरसेवक संजय पवार , शमशोद्दीन जमादार,संदीप जाधव ,दयानंद बिराजदार बाळासाहेब शिंदे, ब्रिजेश बिराजदार,सुरेंद्र पौळ ,विजय चव्हाण,संतोष शिरगुरे,सतीश सुरवसे ,विष्णू माने,भरत जाधव,श्री . तांबे, श्री .माळी याच्यासह बँकेच्या सातही शाखेचे शाखाधिकारी, कर्मचारी, सभासद उपस्थित होते.अमोल पाटील यांनी सूत्रसंचलन केले तर संचालक साहेबराव पाटील यांनी आभार मानले.