नाशिक : कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय उत्तम नगर सिडको नाशिक मधील प्रा.रविराज अंबादास वटणे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नुकतीच राज्यशास्त्र विषयातून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.त्यांनी “महाराष्ट्रातील दबाव गट आणि त्यांची राजकारणातील भूमिका-2005 ते 2015” या विषयावर संशोधन कार्य केले आहे. * पेमराज सारडा महाविद्यालय,अहमदनगर त्यांचे संशोधन केंद्र होते. प्रा.डॉ. विलास आवारी सर यांचे मार्गदर्शन लाभले. संशोधन केंद्र समन्वयक प्रा.डॉ.ज्योती बिडलान यांचे ही मार्गदर्शन लाभले,यासाठी मौखिक चाचणी(VIVA)घेण्यासाठी प्रा.डॉ़ बाबासाहेब मुंढे अध्यक्ष म्हणून तर बहिस्थ परीक्षक म्हणून प्रा. डॉ़. विजय तुंटे लाभले महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ़.जे. डी.सोनखासकर यांचे विशेष सहकार्य लाभले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था, नाशिक चे सर्व पदाधिकारी, तालुका सदस्य, सेवक सदस्य, शिक्षणाधिकारी यांनी विशेष कौतुक व्यक्त केले़. डॉ.रविराज वटणे हे मुळ तुळजापूर येथील रहिवासी आहेत ते तुळजापूर येथील माजी सुभेदार कै.अंबादास वटणे यांचे सुपुत्र आहेत़ प्रा.रविराज वटणे यांच्या यशाचे कौतुक सबंध तुळजापूर शहर वासियाच्या वतीने तसेच वटणे,रोचकरी परीवाराच्या वतीने होत आहे़.