संतोषशिंह रावत यांचे हस्ते चेक वाटप
मुल-चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदी कांग्रेसचे नेते तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली तेंव्हापासूनच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील आकस्मिक मृत्यू झालेल्यांच्या वारसांना तसेच दुर्धर आजारांनी त्रस्त असलेल्या रूग्णांना,शेतकरी कल्याण निधी मधून उपचारासाठी आर्थिक मदत देण्याचे काम करीत असून आकस्मिक संकट आलेल्या आणि साप चावून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना तसेच घर जळून बेघर झालेल्यांना व धानाचे पुंजने जळून आकस्मिक आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करुन रुग्णांच्या कुटुंबियांना आधार देण्याचे काम बँक करीत असून मुल तालुक्यातील बोड!ला येथील अल्प भूधारक शेतकरी विलास नागपुरे व गयाबाई पोरटे यांच्यावर वीज पडल्याने दोघेही जागीच मृत्यू पावले. ही माहिती सरपंच जालिंदर बांगरे यांनी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना दिली असता CDCC बँकेच्या शेतकरी कल्याण निधीमधून मृतकाचे वारसदार नेमाजी नामदेव पोरटे यांना दहा हजार व ताराबाई (विलास) नागपुरे यांना दहा हजार रुपयांचे चेक अध्यक्ष रावत यांनी त्यांच्या घरी जाऊन ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिला. याप्रसंगी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनशाम येनुरकर, युवक कांग्रेसचे अध्यक्ष पवन निलमवार, गुरु गुरनुले , सरपंच जालिंदर बांगरे, नांदगाव सरपंच ऍड.हिमानी वाकुडकार, उपसरपंच सागर देऊलकर, तंटा मुक्त समिती अध्यक्ष निलेश बांगरे, ताराबाई नागपुरे, योगेश शेरकी, यांचेसह अनेक गावकरी उपस्थित होते. तसेच मृतकांच्या वारसांना शासनाकडून सुद्धा तात्काळ मदत मिळवुन देण्यासाठी तहसीलदार रवींद्र होळी यांचेसह प्रत्यक्ष चर्चा केली असून दोन दिवसात त्यांना शासनाकडून मदत देण्यात येईल असे लाभार्त्यांच्या वारसदारांसमोर तहसीलदार होळी यांनी मोबाईल वर बोलल्याचे रावत यांनी प्रत्यक्ष एकविले.