पांढरे वाडी येथील आरती विजय झगडे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे पांढरे वाडी ग्रामपंचायत मधील रोहिणी बनकर यांनी राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पद हे रिक्त होते. ग्रामपंचायतीचे उपसरपंच हे एक महिन्यापूर्वी राजीनामा दिला होता त्यामुळे सदरील उपसरपंच निवडीची प्रक्रिया ही पांढरे वाडी ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आली असता सदरील जागेसाठी फॉर्म भरण्याची मुदत होती या मुदतीत फक्त आरती झगडे यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे सदरील उपसरपंचपदी आरती झगडे यांची बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.निवडीची प्रक्रिया सरपंच छाया नानासाहेब झगडे यांचा अध्यक्षते खाली पार पडली निवडणूक अधिकारी तथा ग्रामसेवक जालिंदर पाटील यांनी केले या निवडीसाठी माजी सरपंच मनोहर जाधव, बापूसाहेब झगडे, मोहन् कुलगे सर्व सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *