पुणे : इंडियन स्वच्छता लीग ही भारतातील पहिली आंतर-शहर स्पर्धा आहे ज्याचे नेतृत्व युवकांनी कचरामुक्त शहरे बनवण्याच्या दिशेने केले आहे. १७ सप्टेंबर रोजी हाती घेण्यात येणार्‍या उपक्रमांचे नियोजन यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल 'विशेष उल्लेखनीय गुणगौरव' या पुरस्काराने इंदापूर नगरपरिषदेचा गुणगौरव करण्यात आला. मुख्याधिकारी राम कापरे यांनी पुरस्कार स्वीकारला. 

    पुणे जिल्ह्यातील ५ शहरांना स्वच्छ भारत अभियान २०२१-२२ अंतर्गत विविध श्रेणीमध्ये पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील वर्षीही या अभियानांतर्गत नागरिकांच्या सहभागातून या वर्षापेक्षा चांगली कामगिरी होईल, असा विश्वास मुख्याधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत पुणे जिल्ह्याची कामगिरी अव्वल आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०२१-२२ मध्ये झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये पुणे जिल्ह्यातील ५ शहरांनी विविध श्रेणीमध्ये अव्वल स्थान पटकावून पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलेला आहे.
  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम वर संपन्न झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण व शहर राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका, बारामती, लोणावळा, सासवड व इंदापूर नागरपालिकेस विविध श्रेणीमधील पुरस्कार  देऊन सन्मानित करण्यात आले.  
  एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे 
 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *