देवीची मूर्ती घेऊन भावंडं घरी निघाले, वाटेत मृत्यू वीज बनून कोसळला, बहिणीचा मृत्यू
वाशिम : विज अंगावर विज कोसळल्यामुळे वाशिम येथील एका १७ वर्षिय शाळकरी मुलीचा दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना घडल्याने सर्वञ हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या ज्योतीचे वडील हॉटेलमध्ये मजुरी करतात तर आई भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करते. ज्योतीला आणखी एक भाऊ आणि एक बहीण आहे, यात ज्योती सर्वात मोठी होती. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.

दिवसभर फुलं विकून घरी जाणाऱ्या भाऊबहिणीवर काळाने घाला घातला असून यात बहीण ज्योती महादेव बनसोडे हिचा अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झालाआहे. तर तिचा लहान भाऊ करण महादेव बनसोडे गंभीर जखमी झाला आहे. वाशिम पुसद मार्गावरील रेल्वे पुलावर ही दुर्दैवी घटना घडली असून पुलाच्या कठड्यालाही तडे गेले आहेत.देवीची मूर्ती घेऊन जाणाऱ्या भावा-बहिणीवर वीज कोसळली, बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी झाला आहे.वडील मजूर, आई भाजी विकते घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या ज्योतीचे वडील हॉटेलमध्ये मजुरी करतात तर आई भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करते. ज्योतीला आणखी एक भाऊ आणि एक बहीण आहे, यात ज्योती सर्वात मोठी होती. काल दसरा असल्याने तिच्या आईने झेंडूची फुलं विकण्यासाठी गाडा लावला होता. ज्योतीच्या कॉलेजला काल सुट्टी असल्याने ती दुसऱ्याच्या शेतात मजुरीसाठी गेली होती. तर सायंकाळच्या सुमारास आईला दसऱ्याचा स्वयंपाक करायचा असल्याने तिचा लहान भाऊ आणि ती फुले विकण्यासाठी थांबले होते.भुलाबाईची मूर्ती घेऊन घराकडे निघाले फुले विकून झाल्यावर त्यांनी गाडा लावून दिला आणि भुलाबाईची (पार्वती देवी) मूर्ती विकत घेऊन घराकडे निघाले. त्याच वेळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. मात्र, घर जवळ आल्याने त्यांनी आडोशाला थांबण्याऐवजी वेगाने घरी जाण्याचा निर्णय घेतला. रेल्वे पुलावरुन जात असतानाच अचानक कानठळ्या बसवणारा आवाज झाला आणि ज्योतीच्या डाव्या बाजूला वीज कोसळली. क्षणात होत्याचं नव्हत झालं. तिचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत सायकल घेऊन असलेला भाऊही गंभीर जखमी झाला आहे.या घटनेमुळे परिसरात सर्वञ हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206