वाशिम :- वृक्षप्रेमी आणी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार्‍या काशीनाथ परळीकरांनी स्वतः लावलेल्या मंगरुळपीर शाॅपिंग काॅम्ल्पेक्समधील पिंपळवृक्ष आजही तेवढ्याच ताठ मानेने ऊभा असुन सर्वांना गार सावलीसह आॅक्सिजन देत असल्याने काशीनाथ परळीकर यांच्या आठवणी ताज्या होतात.
वृक्षवल्ली आम्हा वनचरे या म्हणीप्रमाने मानव आणी पर्यावरणाचा मोठा घनिष्ट सबंध आहे.मंगरुळपीर येथील नामांकित असलेल्या परळीकर परिवारातील सर्वपरिचित आणी मनमिळावु व सुस्वभावी व्यक्तीमत्वाचे धनी म्हणून ओळख लाभलेल्या काशीनाथ परळीकरांनीही पर्यावरणाशी गट्टी करत एक महाकाय पिंपळवृक्ष त्यांच्या आठवणीची आजही साक्ष देतो.मंगरुळपीर शहरातील मध्यभागी असलेल्या ठिकाणी सुरुवातीला परळीकरांचे नामांकीत हाॅटेल होते.

या हाॅटेलमध्ये हजारो खेड्यापाड्यातुन आलेले हजारो लोक चहापान,नाष्टा,जेवण करायचे.हे करत असतांना लोक आजुबाजुला ऊभे राहुन सावलीचा आसरा शोधायचे ,लहान बालके,वृध्द ऊन्हातान्हाने जीवाची काहीली करत हाॅटेलमध्ये येत परंतु पुरेशी सावली नसल्याने आसरा शोधत.हिच गोष्ट काशिनाथ परळीकरांच्या चाणाक्ष दृष्टीने हेरली आणी या लोकांसाठी सुखाची समाधानाची सावली ऊपलब्ध करुन देण्याचा संकल्प केला.जिथे हाॅटेलचे काउंटर होते तिथे एका पिंपळवृक्षाचे झाड लावले.पाहता पाहता या पिंपळवृक्षाने आपला पसारा पसरवला आणी मोठ्या वृक्षात रुपांतर झाले.

हजारो लोक या पिंपळवृक्षाखाली सावलीसाठी आसरा घेवु लागले.पुढे हा वृक्ष महाकाय स्वरूपात डौलाने ऊभा राहला.पण लगेच या जागेमध्ये नगरपरिषदेचे शाॅपिंग सेंटर बांधन्याचा प्रशासनाने निर्णय घेतल्या तेव्हा हा महाकाय वृक्ष तोडण्याची वेळ आली परंतु तत्कालीन नगराध्यक्ष वार्डेकर यांनी काशिनाथ परळीकरांची ही आठवण लोकांना सतत सावली देत राहावी या पर्यावरणप्रेमी भावनेतुन वृक्षाला कुठलीही बाधा न आनता शाॅपिंग सेंटर ऊभारले.परळीकर परिवार हा खुप मोठा आहे परंतु आजही सर्वजन एकञ नांदतात.अनेक चांगल्या बाबी या परिवाराकडुन घेण्यासारख्या आहेत.तसाच हा पिंपळवृक्ष पर्यावरणाची साक्ष देत आपल्या शाखा पसरवुन डौलाने आजही ऊभा आहे.परळीकर परिवारासाठी ही स्मृती आजही अभिमानाची आहे.आपणही काशिनाथ परळीकर यांच्यासारखी दृरदृष्टी ठेवुन आपल्या पश्चातही लोकांसाठी सावली बनुन ऊभे राहावे हीच यानिमित्य सदिच्छा.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *