वाशिम:-मंगरुळपीर येथे मंगरुळपीर प्रिमीअर लिग MPL ची सुरुवात झाली आहे.या क्रिकेट सामण्याचे ऊद्घाटन पोलीस ऊपविभागिय अधिकारी श्री.यशवंत केडगे यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात करण्यात आले आहे.

क्रिकेट खेळाने संपुर्ण जगाला वेड लावले आहे एवढा लोकप्रिय असणारा क्रिकेट खेळ मंगरुळपीर मध्येही क्रिडाप्रेमी खेळत असतात.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘मंगरुळपीर प्रिमिअर लिग’च्या सामण्यांची सुरुवात करण्यात आली आहे.पोलिस विभागातील लोकप्रिय अधिकारी म्हणून नावलौकीक असणारे पोलिस ऊपविभागीय अधिकारी श्री.यशवंत केडगे यांच्या हस्ते सामन्याचे ऊद्घाटन करुन सुरुवात करण्यात आली.क्रीकेट हा सांघीक खेळ आहे.या खेळामुळे शारिरीक व्यायामासोबतच एकतेची,निर्णयक्षमतेची आणी यश अपयश पचवन्याची क्षणता दृढ होत असुन ऊकृष्ट खेळप्रकार असल्याचे मत श्री.यशवंत केडगे यांनी सामन्याच्या ऊद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.यावेळी श्री.रविद्र कातखेडे, राजुभाऊ पडघान,जय गीरी आणी आयोजक मंडळी सोबतच दुरदुरवरुन हा क्रिकेट सामना खेळायला आलेले खेळाडु आणी क्रिकेटप्रेमींची ऊपस्थीती होती.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206