अपघात टाळण्यासाठी सबंधित अधिकार्यांशी ऊपाययोजनां संदर्भात चर्चा


वाशिम :-जिल्हयामध्ये अपघाता मध्ये वाढ होवून अपघातातील मृत्युचे प्रमाणात वाढ होत असून सदरची बाब ही काळजीची आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्या करीता उपाययोजना करणे बाबत दिनांक १३ / १० / २०२२ रोजी वाशिम जिल्हा पोलीस अधिकक्षक श्री. बच्चनसिंह, भापोसे यांनी घेतलेल्या काईम मिटींग मध्ये जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी सर्व ठाणेदार यांना सुचना दिल्या होत्या. दिनांक १४/१०/२०२२ रोजी वाशिम जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. बच्चनसिंह साहेब, भापोसे यांनी स्वत: नागपूर- औरंगाबाद हाये वे वर भेट दिली. त्याकरीता पहाणी करते वेळी उपप्रादेशीक परिवहन अधिकारी वाशीम विभागाचे अधिकारी, नॅशनल हाय वे चे इंजिनिअर, पोलीस विभागाचे अधिकारी यांना बोलावून घेण्यात आले होते ते सर्व हजर होते. नॅशनल हायवे वरील प्राणघातक अपघात होणारे स्थळी १. पेडगांव गांवाचे हायवे वरील मरीमाता मंदीराजवळ भेट देवून त्याठिकाणी अपघात प्रवण स्थळ फलक व साईन फलक लावणे बाबत सुचना दिल्या २. त-हाळा गावाजवळील नाल्यावरील पुलावर भेटी देवून त्याठिकाणी दोन्हीकडून ब्लींकर लाईट व फलक लावण्याच्या सुचना दिल्या. ३. त-हाळा येथील मस्जीद टर्निंग पॉईन्ट व भायजी महाराज संस्थान कमान जवळील टर्नीग येथे भेट देवून त्याठीकाण रोडच्या साईड भरणे, इशारा बोर्ड लावणे व ब्लींकर लाईट लावण्याच्या सुचना दिल्या ४. शेलुबाजार चौक येथे भेट देवून त्याठिकाणी ब्लींकर लाईट लावणे व डिव्हाडरवर रेडीयम लावण्याच्या सुचंना दिल्या. ५. वनोजा फाटा येथे भेट देवून त्याठिकाणी नॅशनल हाये- वे ला वनोजा व पुर ‘शावाकडून मिळणारे रोडवर ब्लींकर्स लाईट लावणे व गतिरोधक बसवून त्यावर रेडीयम व पांढरे पटटे लावण्याच्या सुचना दिल्या.

तसेच नॅशनल हायवे वर ज्या ठिकाणी मोठे चौक आहेत त्या ठिकाणी ब्लींकर्स लावावे या बाबत सबंधीतांना सुचना दिल्यात.त्यानंतर श्री. बच्चनसिंह पोलीस अधीक्षक वाशीम यांनी अपघाताचे प्रमाणा कमी करण्याचे व त्यावर उपाय योजना करण्ययाचे दृष्टीने आणि येणा-या अडीअडचणी बाबत दुरक्षेत्र शेलुबाजार येथे सर्व सबंधीतांची बैठक घेवून चर्चा केली व सुचना दिल्यात. नॅशलन हायवे वरील अपघात स्थळांची पहाणी करते वेळी व बैठकी करीता श्री.यशंवत केडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरुळपीर, श्री सुनिल हुड, ठाणेदार मंगरुळपीर सपोनि मंजूषा मोरे दुरक्षेत्र शेलुबाजार ईन्चार्ज, पप्रादेशीक परिवहन अधिकारी वाशीम विभागाचे मोटर वाहन निरीक्षक श्री.शेगांवकर व त्यांचे अधिकारी, नॅशनल हाय-वे ७५३ सि चे रस्ता देखभाल करणारे कॉन्ट्रक्टर इंजिनिअर निरज गवई, साळुंकाबाई महाविद्यालय वनोजा येथील आपतकालीन पथकाचे श्री. डोगंरे सर व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ऊपस्थीती होती.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *