
वाशिम – हिंदुह्दयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होवून गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेत कट्टर शिवसैनिक म्हणून कार्यरत असलेले जुबेर मोहनावाले यांची युवासेनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ही निवड केली आहे.जुबेर मोहनावाले यांच्यावर वाशिम जिल्हयातील मंगरुळपीर,मानोरा,कारंजा या तीन तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे.मोहनावाले हे शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून वाशिम जिल्ह्यात ओळखल्या जात असून शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. शिवसैनिक म्हणून त्यांनी जिल्हयातील वरिष्ठ पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनात तळागाळातील अनेक पिडीतांचे प्रश्न शासन दरबारी मार्गी लावले आहेत. यासोबतच जिल्हयात शिवसेनेचे संघटन व बांधणीमध्ये मोहनावाले यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर युवासेनेची जबाबदारी सोपविली आहे. याबाबत युवासेनेच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातून १३ ऑक्टोंबर रोजी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेचे एक सच्चे शिवसैनिक असलेले जुबेर मोहनावाले यांच्यावर युवासेनेची कमान सोपविल्यामुळे शिवसैनिकांत आनंद पसरला असून सर्वस्तरातुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रतीनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206