वाशिम:- दिनांक १२/१०/२०२२ रोजी पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे फिर्यादी प्रकाश धमानी रा. सिंध्दीकॅम्प
वाशीम यांनी रिपोर्ट दिला की, त्यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय असुन त्यांना त्यांच्या व्यवसायाकरीता मल्टीपल कॅमे-या घेण्या करीता ८,२५,०००रु जमा केले असता दिनांक १०/१०/२०२२ रोजी तो त्याचे दुकानात पैसे मोजत असतांना आरोपी शंकर चांदवाणी हा दुकानावर आला व काही वेळ तेथे थांबुन परत गेला.

त्यानंतर फीर्यादी हे पैसे घरी ठेवण्या करीता मोटार सायकल क एम एच ३७ एए ८११६ चे डिक्की मध्ये नगदी ८,२५,०००रु एक पिशवी मध्ये ठेवुन घरी जाण्यास निघाला असता रस्त्यात गोदावरी दुध डेअरी या दुकानवर मोटार सायकल उभी करुन दुध
घेत होता. त्यावेळी नमुद आरोपी शंकर चांदवाणी रा. सिध्दीकॅम्प वाशीम याने सदरची मोटार सायकल गाडीचे
डिक्कीमध्ये असलेले ८,२५,०००रु घेवुन घटनास्थळावरुन पळुन गेला त्याचा पाठलाग केला असता तो मिळुन आला नाही. त्यानंतर त्यांचा फीर्यादी व नातेवाईकांनी शोध घेतला असता तो मिळुन आले नाही. त्यानंतर पोलीस स्टेशन वाशीम येथे दिनांक १२ / १० / २०२२ रोजी फीर्यादीने रिपोर्ट दिला. त्यावरुन अपराध क्र. ७८५ / २२ कलम ३७९भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा वाशीम येथील पोउपनिरी शब्बीर पठाण पोना / अमोल
इंगोले, श्रीराम नागुलकर, पोका / किशोर खंडारे यांचे पथक तयार करुन समांतर तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहीतीवरुन नमुद गुन्हयातील आरोपी शंकर गोविंदराम चांदवाणी यांचा शोध घेतला असता शंकर चांदवाणी व त्याचे सोबत मनोज शिंदे रा. सेक्युरा हॉस्पीटल मागे वाशीम यांना ताब्यात घेण्यात आले व त्यांचे कडुन गुन्हयातील एक मोटार सायकल क एम एच ३७ एए ८११६ किंमत ५०,०००रु व नगदी
६,७०,०००रु असा एकुण ७,२०,०००रु चा जप्त करण्यात आला आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चनसिंह साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री. भामरे साहेब यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ जाधव स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांचे पोउपनिरीक्षक शब्बीर पठाण, पोना अमोल इंगोले, श्रीराम नागुलकर, पोकॉ किशोर खंडारे यांनी केली आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206