वाशिम:- दिनांक 13/10/2022 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय येथे गुन्हे आढावा परिषदचे आयोजन
करण्यात आले असता सदर बैठकीमध्ये सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, प्रभारी अधिकारी
आणी सर्व शाखा प्रमुख हजर होते.
सर्व हजर अधिकारी यांनी विशेष परिश्रम घेउन मागील दोन
महीण्यांमध्ये असलेले सर्व महत्वाचे बंदोबस्त योग्य प्रकारे पार पाडल्या बद्दल मा. पोलीस अधिक्षक
यांनी सर्व अधिकारी यांचा सत्कार केला.सदर गुन्हे परिषदेमध्ये मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी जिल्हयामध्ये दाखल
फसवणुकीच्या गुन्हयांचे तपासामध्ये जास्तीत जास्त आरोपींना अटक करून फसवणुक करण्यात
आलेली रक्कम विनाविलंब तक्रारदार यांना परत मिळण्याच्या प्रक्रियेबाबत उपस्थित अधिकारी यांना
मार्गदर्शन केले.तसेच जिल्हयामधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दरोडा, जबरी चोरी, मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले, तसेच मोठया प्रमाणात अनैतिक मानवी वाहतुकीचे गुन्हे ऊघडकीस आणले आहे.तसेच मा.न्यायालयामध्ये खुन, विवाहितेचा छळ व गंभीर दुखापत इत्यादी गुन्हयातील साक्षीदार
यांचे मध्ये समन्वय ठेउन योग्य पाठपुरावा केल्याने सदर गुन्हयात आरोपीस शिक्षा झाली

आहे.वाशिम जिल्हयातील आयुश वाईन बार मधुन मोठया प्रमाणात बनावट विदेशी दारू जप्त केली. तसेच मालेगांव हद्दीमध्ये महाराष्ट्रा मध्ये प्रतिबंध असलेला सुगंधीत तंबाखु मोठया प्रमाणात
जप्त केला.याचबरोबर जलद गतीने होण्याकरीता हजारो गुन्हेगारांबाबतची माहीती CRISP या अँपद्वारे
संकलीत करण्याता आली आहे. व नागरीकांनी तक्रार नोंदविल्यानंतर त्यांचे तक्रारीचे निराकरण करणेकामी SEVA हि प्रणाली सुरु असुन सदर दोन्ही प्रणाली मध्ये उत्कृष्ट कामगीरी करण्यात आली आहे.या सर्व उत्कृष्ट कामगीरी करणारे व 12 पोलीस अधिकारी व 48 पोलीस अंमलदार यांचे मा.पोलीस अधीक्षक यांनी प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
