पुणे :-
शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी ३० वर्षांनी एकत्रित येत चाळीशी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी १९९२ मधील आठवणींना उजाळा दिला.
चिंचोली मोराची येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १९९२ साली शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन चिंचोली मोराची येथील उकिर्डे मळ्यातील मयुरे कृषी पर्यटन येथे पार पडले. या स्नेहस़ंमेलनात ४५ विद्यार्थी,विद्यार्थीनींनी सहभाग घेतला.
यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली स्वत:ची ओळख करून देताना शाळेतल्या गमतीजमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच समाजात वावरताना एकमेकांना आलेल्या, येणा-या अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना यावेळी व्यक्त केली.

शाळेचे माजी विद्यार्थी पोपट उकिर्डे यांनी ही माहिती दिली.
शिक्षक सुदामराव रघुनाथ खैरे गुरूजी यांचा सत्कार यावेळी सर्व विद्यार्थ्यानी केला.
पोपट उकिर्डे यांनी स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक केले. संभाजी नाणेकर यांनी सुत्रसंचलन केले. सुनिता करंजकर यांनी आभार मानले.
- एन टी व्ही न्यूज मराठी साठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे
8975598628