रांजणगाव एम आय डी सी तील फियाट कंपनीतील ट्रिम एरियाजवळील मैला चेंबरमधील घटना
पुणे :-
मैला चेंबरमध्ये काम करीत असताना पाय घसरून पडल्याने एकाचा मृत्यू झाला. चेंबरमध्ये उडी टाकून त्याला वर काढत असताना दुस-याचाही मृत्यू झाला.
मच्छिंद्र दादाभाऊ काळे वय – ४२ वर्षे रा.शिंदोडी ता.शिरूर जि.पुणे ,सुभाष सुखदेव उघडे वय -३४ वर्षे रा.शिरूर जि.पुणे अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे असून ही दुर्घटना दि.४/११/२०२२ रोजी साडेदहा वाजता रांजणगाव एम आय डी सी तील फियाट कंपनीतील ट्रिम एरिया जवळील मैला चेंबरमध्ये घडली.
दत्तात्रय दादाभाऊ काळे रा.शिंदोडी ता.शिरूर जि.पुणे यांनी या घटनेची खबर रांजणगाव एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशनमध्ये दिली.

रांजणगाव एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी.के.मांडगे
यांनी दिलेल्या माहितीनूसार, शिंदोडी येथील दत्तात्रय दादाभाऊ काळे यांनी खबर दिली की,मयत सुभाष सुखदेव उघडे हा फियाट कंपनीतील ट्रिम एरियाजवळील मैला चेंबर मध्ये काम करीत असताना त्याचा पाय घसरून चेंबरमध्ये पडला. त्यावेळी मयत मच्छिंद्र दादाभाऊ काळे याने चेंबरमव्ये उडी टाकून उघडे यास वर काढत असताना तो सुद्धा चेंबरमध्ये पडला.
त्यांना उपचारकामी शिरूर येथील श्री.गणेशा हॉस्पिटल येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून ते मयत झाले असल्याचे सांगितले.
पोलीस सब इन्स्पेक्टर शिंदे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
एन .टी.व्ही .न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे
8975598628