रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूक

पुणे :-
शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचा रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन ऍड. आमदार अशोक बापू पवार यांचे पॅनेलला जाहीर पाठिंबा देत असल्याचे शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रमुख,राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल पवार यांनी सांगितले.


याबाबत बोलताना पवार यांनी सांगितले की, सहकार चळवळीमध्ये राजकारण करून चालत नाही आणि राजकारण केलं तर ती सहकार चळवळ मोडीत निघते याची अनेक उदाहरणे मी महाराष्ट्र राज्यामध्ये पाहिलेली आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये २०२ सहकारी तत्त्वावर चालणारे साखर कारखाने होते परंतु त्यामध्ये या न त्या कारणाने राजकारण व दुही निर्माण होऊन आज राज्यातील सुमारे १०४ साखर कारखाने बंद पडून खाजगी क्षेत्रातील उद्योजक लोकांनी गिळंकृत केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची सहकार चळवळ वाचवायची असेल तर सहकार तत्त्वावर चालणारे चांगल्या साखर कारखान्यांना व चांगल्या नेतृत्वाला पाठिंबा देणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने विद्यमान चेअरमन, आमदार ऍडव्होकेट अशोक बापू पवार यांच्या शेतकरी विकास पॅनलला शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. तसेच संघटनेचे शिरूर ,दौंड ,श्रीगोंदा पारनेर व पुणे संघटनेचे सर्व पदाधिकारी व सभासद यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद, शेतकऱ्यांनी सहकारी तत्त्वावर चालणारा घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा आपल्या शेतीमातीशी, आपल्या प्रपंचाशी निगडित असा घोडगंगा सहकारी साखर कारखाना आहे.
२५ वर्षांपूर्वी १७ वर्षांचे खडतर परिश्रमातून घोडगंगा सहकारी साखर कारखाना १९९७ ला त्यावेळी रावसाहेब दादा पवार व सर्व शेतकरी सभासद यांचे सहका-यांनी मोठ्या कष्टाने उभा केलेला साखर कारखाना आहे असे शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे प्रमुख, राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल पवार यांनी सांगितले.
एन. टी.व्ही न्यूज मराठीसाठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी
ता.शिरूर जि.पुणे
8975598628

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *