शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारख्यान्याच्या सन २०२२-२०२७ या पंचवार्षिक निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेल च्या प्रचारासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीपराव वळसे पाटील यांची जाहीर सभा गुरूवार दि. ३/११/२०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील वाघेश्वर मंदीर परिसरात आयोजित केलेली आहे.
शेतकरी विकास पॅनेल प्रमुख ,आमदार,ऍड. अशोक पवार यांनी ही माहिती मेसेजद्वारे दिली.
शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवार दि.६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत असून संस्था व गट प्रतिनिधी म्हणून ऋषिराज अशोक पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मांडवगण फराटा गटातून दिलीप आनंदराव फराटे, संभाजी शिवाजी फराटे,इनामगाव गटातून सचिन बाबासाहेब मचाले ,नरेंद्र आण्णासाहेब माने, वडगाव रासाई गटातून अशोक रावसाहेब पवार, उमेश सुदाम साठे, न्हावरे गटातून संजय ज्ञानदेव काळे, मानसिंग सिताराम कोरेकर, शरद मोहनराव निंबाळकर ,तळेगाव ढमढेरे गटातून सोपान वाल्मिकराव गवारी, विश्वास रामकृष्ण ढमढेरे, पोपट रामदास भुजबळ ,शिरूर गटातून वाल्मिक धोंडीबा कुरूंदळे ,सुहास नारायण थोरात ,प्र.ना.उर्फ आबासाहेब पाचूंदकर ,अनुसूचित जाती / जमाती प्रतिनिधी म्हणून उत्तम रामचंद्र सोनवणे, महिला प्रतिनिधी म्हणून मंगल सुहास कोंडे, वैशाली सुनिल जगताप,इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून शिवाजी मुक्ताजी गदादे ,भटक्या विमुक्त जाती /जमाती विशेष मागासवर्ग प्रतिनिधी म्हणून बिरा बाबू शेंडगे हे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
एन टी व्ही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे
8975598628