गड किल्ल्यांचे जतन करणे,संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून गडकोट किल्ल्यांचा इतिहास जाणून घ्या असे आवाहन प्रा.सतिश धुमाळ यांनी केले.
शिरूर येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने लहान व मोठ्या गटात किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. बक्षिस विजेत्यांना ,सहभागी स्पर्धकांना शिरूर येथील जिजामाता उद्यानात प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले .या कार्यक्रमात प्रा.धुमाळ बोलत होते.
दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या किल्ले बनवा स्पर्धत लहान गटात तन्मय राऊत या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला. आदर्श काळोखे या विद्यार्थ्याने द्वितीय ,साई ससाणे या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटकावला.
मोठ्या गटात ओम वाळके, पार्थ कडेकर, सोहम आवचार यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
आदित्य ठोंबरे याने द्वितीय, ऋषिकेश गुजर याने तृतीय क्रमांक पटकावला.

कार्यक्रमाची माहिती देताना उमेश शेळके यांनी प्रास्ताविकात सांगितले, मुलांना गडकिल्ल्यांची माहिती व्हावी ,किल्ल्यांविषयी कुतूहल निर्माण व्हावे या उद्देशाने दिवाळी निमित्त किल्ले बनवा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती अभिजित आंबेकर, जनता दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर ,सेवानिवृत्त लष्करी अधिकारी वसंत कटके, तर्डोबाची वाडीचे उपसरपंच गणेश खोले, शोभना पाचंगे, प्रा.सुदाम वीर ,कुणाल काळे बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थित होते.
कुणाल काळे यांनी स्वागत केले तसेच आभारही मानले.
एन टी व्ही न्यूज मराठी साठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी
ता.शिरूर जि.पुणे
8975598628