सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शिरूर शहरात राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.
शिरुर नगरपरिषदेच्या नवीन इमारती पासून ही दौड सुरु झाली. दौड सुरु होण्यापूर्वी एकात्मते संदर्भात उपस्थितांनी शपथ घेतली. ही दौड पाबळफाटा पुणे – नगर रस्त्याने शिरुर बसस्थानक मार्गे शिरुर तहसिल कार्यालयापर्यंत गेली.
या दौडीत शहरातील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, विविध शाळेचे विद्यार्थी, सामाजिक व स्वयंसेवी संस्था यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला .

नायब तहसिलदार स्नेहा गिरिगोसावी, पीएसआय एकनाथ पाटील, शिरुर नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य निरीक्षक दत्तात्रेय बर्गे ,थिटे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य अमोल शहा , राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. ब्रिजेश तांबे , प्रा. डॉ. व्यंकटेश केत ,
आरएमडी शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी घारु ,शिरुर नगरपरिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय वाघ , संतोष चव्हाण , मुख्याध्यापक मारुती कदम , वात्सल्य सिंधु फाऊंडेशनच्या उषा वाखारे ,जनविकास फाउंडेशनचे तुषार वेताळ ,महाराष्ट्र साहित्य परिषद शिरुरचे उपाध्यक्ष प्रा. सतिश धुमाळ आदी उपस्थित होते .
राष्ट्रीय एकता दौड कार्यक्रमाबाबत माहिती देताना शिरुर नगरपरिषदेचे स्वच्छता व आरोग्य निरीक्षक दत्तात्रेय बर्गे यांनी सांगितले की ,
स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि आझादी का अमृत महोत्सवाचा संदेश देशभरात पोहचविण्याच्या उद्देशाने देशभर युनिटी रनचे आयोजन करण्यात
आले आहे. आपल्या राष्ट्राची एकता, अखंडता आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी सरदार पटेल यांचे योगदान महत्वपूर्ण होते असे बर्गे यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दौडीच्या मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .
एन टी व्ही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे
8975598628