छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात शिवसेना संघटनेत महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. नेवरगाव गटाच्या विभागप्रमुखपदी संपत आबा मनाळ यांची निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

गंगापूर तालुक्यातील नेवरगाव गटातून शिवसेना विभागप्रमुखपदी मा. श्री. संपत आबा मनाळ यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे नेवरगाव गटासह परिसरातील शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत आगामी काळात शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संपत आबा मनाळ यांच्या निवडीबद्दल राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

यावेळी ऋषिकेश पा. मनाळ (चेअरमन, वाहेगाव व उपतालुकाप्रमुख, गंगापूर) यांनी संपत आबा मनाळ यांचा सत्कार करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अमोल पारखे | एनटीव्ही न्यूज मराठी | गंगापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *