मुंबई  : राज्यात पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील विद्यार्थ्यांसाठी शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा विक्रोळी-घाटकोपर आणि संलग्न कुणबी युवा यांच्या संयुक्त विद्यमाने कुणबी समाज युवक -युवती यांच्यासाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण शिबीर रविवार( दि.१३/११/२०२२) रोजी गूरूकूल हॉल,रोड नंबर ६, पार्कसाईट , विक्रोळी पश्चिम, मुंबई - ४०००७९ येथे संपन्न झाले.या शिबिरात  प्रमुख मार्गदर्शक म्हणून  मा. रोहिदास दुसार  ( माजी असिस्टंट पोलीस कमिशनर व उप प्राचार्य ट्रेनिंग शाळा, खंडाळा )उपस्थित होते.
शिवाय श्री.माधवजी कांबळे(अध्यक्ष-मध्यवर्ती कुणबी  युवा मंडळ),संघ का. सदस्य प्रकाश वालम,शाखा पदाधिकारी,महिला कार्यकारणी, युवक कार्यकारणी, विवाह मंडळ कार्यकारणी, सदस्य आणि सभासद यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
     मा. रोहिदास दुसार ( माजी असिस्टंट पोलीस कमिशनर व उप प्राचार्य ट्रेनिंग शाळा, खंडाळा )यांनी मार्गदर्शन शिबिरात पोलिस भरतीचा अर्ज कसा भरावा,त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात,त्याची छाननी कशी होते याची माहिती दिली.शारीरिक चाचणीमध्ये किती प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात.त्यासाठी गुण कसे दिले जातात याचे मार्गदर्शनदेखील केले. तसेच शारीरिक चाचणीत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी कोणकोणते शारीरिक व्यायाम केले पाहिजे, आहार काय असला पाहिजे याबद्दलही मार्गदर्शन केले.लेखी परीक्षेसाठी कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करावा, किती गुणांचे प्रश्न असतात. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम व कमी वेळेत पेपर कसा सोडवला पाहिजे, या विषयाचे मार्गदर्शन केले.
        शिबीर यशस्वी करण्यासाठी शाखा अध्यक्ष श्री.सोनू शिवगण यांच्यासह म. शा. अध्यक्षा सौ.अस्विनी बाईत, सरचिटणीस सूरेश मांडवकर,शाखा संस्थापक/माजी शाखा अध्यक्ष आत्माराम बाईत, खजिनदार चंद्रकांत भोज,युवा अध्यक्ष दिलीप कातकर, सरचिटणीस मनिष वालम, खजिनदार अक्षय कुळे, शाखा कार्यालय प्रमुख- खामकर, वीर, सुर्वे यांच्यासह शाखा पदाधिकारी, महिला मंडळ पदाधिकारी, युवक मंडळ पदाधिकारी, विवाह मंडळ पदाधिकारी आणि सदस्य, सभासद यांनी विशेष परिश्रम घेतले.
         कागदपत्रांची जमवाजमव, लेखी परीक्षेची तयारी, शारीरिक चाचणीची पूर्व कल्पना असावी व त्यासाठी कोणती तयारी केली पाहिजे या द़ृष्टीने या प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शाखा अध्यक्ष सोनू शिवगण आणि युवा अध्यक्ष दीपक कातकर यांनी दिली.समाजातील ६०/६५ युवक -युवती यांनी या संधीचा लाभ घेतला असे कुणबी युवा विक्रोळी-घाटकोपर प्रचार-प्रसार टिमने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *