पुणे – नगर महामार्गावरील खंडाळे गावच्या हद्दीतील दुर्घटना
शिरूर तालुक्यातील खंडाळे गावच्या हद्दीत लक्झरी बसने ठोकरल्याने एका वारकरी भाविकाचा मृत्यू झाला असून या अपघातात एक जण जखमी झाला आहे.
गुलाब मोहिद्दीन शेख वय -५९ वर्षे रा.गोलेगाव ता.शिरूर जि.पुणे असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या भाविक वारक-याचे नाव असून बबन महादेव वाखारे वय -६५ वर्षे रा.गोलेगाव ता.शिरूर जि.पुणे असे अपघातातील जखमीचे नाव आहे.
अपघाताची ही घटना १७/११/२०२२ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रकाश संजय शिंदे वय -२५ वर्षे रा.ग़ोलेगाव वरची आळी,साई क्लिनिकमागे ता.शिरूर जि.पुणे यांनी या अपघाताबाबत रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

फिर्यादी प्रकाश संजय शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तसेच रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार, दि.१५/११/२०२२ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गोलेगाव गावातून ओम चैतन्य कानिफनाथ महाराज पालखी ही दिंडी कार्तिक एकादशी निमित्ताने आळंदी येथे पायी जाणेकरिता निघाली. कर्डे तसेच खंडाळे फाटा येथे मुक्काम करून १७/११/२०२२ रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अहमदनगर ते पुणे जाणा-या हायवे रोडने आळंदी येथे जाण्याकरिता निघाली. खंडाळे फाटा येथून हायवे रोड ओलांडून अहमदनगर ते पुणे जाणा-या लेनने शिक्रापूर बाजूकडे निघाली. दिंडीत सुरूवातीस पाण्याचा टँकर त्यामागे १०० ते १५० भजन करणारी महिला व पुरूष त्यामागे ओम चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या पादुका असलेल्या ट्रॅक्टरवरील पालखीचा रथ, त्यामागे पालखीच्या रथावरील स्पिकरचे ऑपरेटर म्हणून काम पाहाणारे गुलाब मोहीद्दीन शेख असे डांबरी रोडच्या डाव्या बाजूने जात होतो. फिर्यादी प्रकाश शिंदे व प्रज्योत सुदिप वाखारे असे मोटरसायकलवरून पालखीबरोबर सावकाश जात होते. दिंडी ८ वाजण्याच्या सुमारास खंडाळे गाधच्या हद्दीतील अहमदनगर ते पुणे जाणा-या लेनवरील शेतकरी हॉटेलच्या पुढे आली असता पाठीमागून एक अशोक लेलन्ड कंपनीची लक्झरी बस नं. एम. पी.४१/पी /६६६३ ही मोटारसायकलच्या पाठीमागे येवून रोडच्या डाव्या बाजूचे किनारपट्टीवरून पालखीला चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना पालखीच्या पाठीमागून चालत जाणारे गुलाब मोहिद्दीन शेख वय -५९ वर्षे रा.गोलेगाव ता.शिरूर जि.पुणे यांना धडक बसून अपघात केला. या अपघातात गुलाब मोहिद्दीन शेख हे बसच्या पुढील चाकाखाली व नंतर मागच्या चाकाखाली येवून चिरडल्याने जागीच मयत झाले.
बबन महादेव वाखारे वय -६५ वर्षे रा.ग़ोलेगाव ता.शिरूर जि.पुणे यांच्या कपाळावर डाव्या बाजूस खरचटले असून डाव्या खुब्याला मुका मार लागून किरकोळ जखमी झाले.
अपघातानंतर बसवरील चालक बस अपघात ठिकाणी सोडून पळून गेला.
अपघात झालेल्या बसचालकाची पोलीसांनी चौकशी केली असता त्याचे नाव शिवकुमार विश्वास वय -४३ वर्षे रा.बंगाली कॉलनी ,रामकृष्ण नगर, होशंगाबाद ,मध्यप्रदेश राज्य असे असल्याचे निष्पन्न झाल्याचे रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी सांगितले.
बस हयगयीने, अविचाराने निष्काळजीपणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे व नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून अपघात केल्याप्रकरणी लक्झरी बसचालकावर रांजणगाव जम आय डी सी प़ोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे असे अंमलदार संतोष औटी यांनी सांगितले.
एन टी व्ही न्यूज मराठीसाठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे
8975598628
——————