मुख्याध्यापक सुदामराव लंघे यांची माहिती
पुणे : शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवी २०२१/२०२२ शिष्यवृत्ती परिक्षेत ११ विद्यार्थी २०० पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याची माहिती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुदामराव लंघे यांनी दिली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढापुरी मधील ११ विद्यार्थी २०० पेक्षा अधिक गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहेत.त्यातील ९ विद्यार्थ्यांना २२० पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.१) वैष्णवी पपुलवार – २६० गुण.२) नरेंद्र योगेश चव्हाण -२४२ गुण.३) मनस्वी नवनाथ गायकवाड -२४० गुण.४) श्रेयस संतोष नाईक – २३८ गुण.५)वैष्षवी रविंद्र गायकवाड -२३४ गुण.६)तेजल जगदाळे -२२६ गुण ७) करण सुनिल कांबळे -२२० गुण.८) मनस्वी सुहास काकडे -२२० गुण९).संदिप वांजरवाडे – २१४ गुण.१०) विष्णू मांग – २०४ गुण.११)मयुरी थेटे १९८ गुण. शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका सौ.संगिता तिरखुंडे, वर्गशिक्षक लालासाहेब जाधव,मुख्याध्यापक सुदामराव लंघे यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान इयत्ता पाचवीतील कुमारी वैष्णवी पपुलवार ही विद्यार्थिनी मंथन परिक्षेत राज्यात १४ वी आली. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती २०२२ परिक्षेत २६० गुण मिळविले .तसेच वैष्णवी पपुलवार या विद्यार्थिनीची जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाल्याने तिने तिहेरी यश प्राप्त केले. विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केल्याबद्दल यशस्वी विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक तसेच मुख्याध्यापक सुदामराव लंघे यांचे शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामविकास फाऊंडेशनचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी सत्कार करून अभिनंदन केले.