साहित्यिक सचिन बेंडभर यांचा आशावाद
पुणे : दर्जेदार साहित्य निर्मितीवर भर दिल्यास निश्चितच वाचकांची पावले ग्रंथालयाकडे वळतील असा आशावाद साहित्यिक सचिन बेंडभर यांनी व्यक्त केला. एन टी व्ही न्यूज मराठीने प्रकाशित केलेल्या वास्तव द रिऍलिटी २०२२ दिपावली विशेषांकात वाबळेवाडी ( ता.शिरूर ) येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्व.अटलबिहारी वाजपेयी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक, साहित्यिक सचिन बेंडभर यांची ‘व्हऊद्याकी वाजवून ….! ही कथा तसेच दुनिया करारे एक सारी ही कविता प्रसिद्ध झाली आहे.
एन टी व्ही न्यूज मराठी च्या वास्तव द रिऍलिटी २०२२ दिपावली विशेषांकात साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या प्रसिद्ध झालेल्या कथा,कवितेची दखल घेवून एन टी व्ही न्यूज मराठीचे शिरूर तालुक्यातील प्रतिनिधी विजय ढमढेरे यांनी साहित्यिक सचिन बेंडभर यांना वास्तव द रिऍलिटी दिपावली विशेषांक २०२२ वाबळेवाडी ( ता.शिरूर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जावून सुपूर्द केला.यावेळी साहित्यिक सचिन बेंडभर बोलत होते.
सध्याची साहित्यिक परिस्थिती,तंत्रज्ञान युगात अडकलेली तरूण पिढी ,वाचन संस्कृती वाढविण्यासाठी होत असलेले प्रयत्न या विषयांवर चर्चा करताना साहित्यिक बेंडभर म्हणाले, महाराष्ट्राला दिवाळी अंकाची मोठी साहित्यिक परंपरा लाभलेली आहे. वाचकांना दरवर्षी दिवाळी अंकाची उत्सुकता असते. दिवाळी अंक म्हणजे त्यांचा साहित्यिक फराळ असतो.हा फराळ वाचल्याशिवाय त्यांना दिवाळी गोड लागत नाही .सकारात्मक दृष्टिकोन ठेवून साहित्य क्षेत्राकडे पाहिले तर निश्चितच भविष्य उज्वल असेल.साहित्यिक सचिन बेंडभर यांचे बालसाहित्य, कथासंग्रह ,कवितासंग्रह , कादंबरी, अनुवाद अशा प्रकारचे विपुल साहित्य संपदा असून त्यांची कळो निसर्ग मानवा ही कविता इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट आहे.आजपर्यंत २० पेक्षा जास्त राज्यस्तरीय पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. साहित्यिक सचिन बेंडभर यांची कथा,कविता एन टी व्ही न्यूज मराठीच्या वास्तव द रिऍलिटी दिपावली विशेषांकात प्रसिद्ध झाल्याने परिसरातील नागरिकांकडून ,साहित्यिक क्षेत्रातून, शैक्षणिक क्षेत्रातून साहित्यिक बेंडभर यांचे अभिनंदन केले जात आहे.