व्हाईस चेअरमनपदी पोपटराव भुजबळ
पुणे : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी शिरूर हवेली तालुक्याचे आमदार ,ऍड. अशोक पवार यांचे चिरंजीव ऋषिराज अशोक पवार यांची बिनविरोध निवड झाली. कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी तळेगाव ढमढेरे गटातून निवडून आलेले पोपटराव रामदास भुजबळ यांचीही बिनविरोध निवड झाली.
कारखान्याच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झालेले ऋषिराज पवार यांची संस्था,गटप्रतिनिधी गटातून कारखान्यावर बिनविरोध निवड झाली होती.कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झालेले पोपटराव रामदास भुजबळ तळेगाव ढमढेरे सर्वसाधारण गटातून ७१३६ मते मिळवून विजयी झाले होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिग्विजय आहेर यांनी काम पाहिले.नव्यांना संधी म्हणून कारखान्याच्या चेअरमनपदी ऋषिराज पवार यांची निवड झाल्याचे बोलले जात आहे.