शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथून तंबाखू,सिगारेट, बंटी चॉकलेट असा एकूण १ लाख ७० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून फरार झालेल्या आरोपीस शिक्रापूर पोलीसांनी अटक केली आहे.
आकाश उर्फ बंटी भवरसिंग राजपूत वय २० वर्षे रा.विद्यानगर ,चिंचवड,पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून आरोपीचे इतर दोन साथीदार फरार आहेत.

शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक ,तपास अधिकारी रविकिरण जाधव यांनी चोरीच्या या घटनेबाबत दिलेल्या माहितीनूसार, दि.२३/०७/२०२२ रोजी रात्री शिरूर तालुक्यातील सणसवाडी हद्दीत तंबाखू,सिगारेट,बंटी चॉकलेट असा एकूण १ लाख ७० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल आरोपी आकाश उर्फ बंटी भवरसिंग राजपूत याने इतर दोन साथीदारांच्या मदतीने चोरी केला होता. ४ महिने आरोपी गुंगारा देत होता. पुण्यात जावून आरोपीला अटक केल्याचे तसेच आरोपीचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत असे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक,तपास अधिकारी रविकिरण जाधव यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रविकिरण जाधव चोरीच्या या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
एन टी व्ही न्यूज मराठीसाठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे 8975598628