पुणे : रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज शेटफळगढे विद्यालयात बालकांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पुजन करून बालदिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बी आर भिसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षिका रोहिणी कुबेर,गुरूकुल प्रमुख तात्यासाहेब गाडेकर उपस्थित होते.देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांना मुले प्रिय होती. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो यामुळेच विद्यालयात पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विराज मचाले,स्नेहल हारमोडे, दीक्षा सवाणे,अविष्कार भगत या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.प्राचार्य बी आर भिसे यांनी आपल्या मनोगतातून पंडित नेहरू यांचा जीवन परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.राधा भोसले तर आभार कु वैष्णवी लकडे हिने मानले.कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख अनुराधा जगताप यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व सेवक यांनी परिश्रम घेतले.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे